उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर अंमळनेर यांच्या सोनखेडी पोलीस पाटील भरती संदर्भात केलेला निर्णय मॅट कोर्टाने केला रद्द….

आबिद शेख/अमळनेर
तालुक्यातील मौजे सोनखेडी ता. अंमळनेर येथील पोलीस पाटील भरती संदर्भात उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी श्री. दिनेश छगन मैलागीर यांना पोलीस पाटील भरती मध्ये अपात्र केले होते त्यांनी याविरोधात ऍड. भरत वर्मा यांच्यामार्फत मॅट कोर्टात याचिका दाखल केली होती.सोनखेडी पोलीस पाटील भरती संदर्भात 14सप्टेंबर 2023 ला मॅट कोर्टाने स्थगिती दिलेली होती. त्यानंतर याचिका सुनावणी झाली यात मॅट कोर्टात सर्वोच्च न्यायालयचा आदेशाचा संदर्भ देत मॅट कोर्ट यांनी उपविभागीय अधिकारी अंमळनेर यांच्या आदेश रद्द करून श्री. दिनेश मैलागीर यांना अपात्रतेचा आदेश रद्द करण्यात येऊन मुलाखतीस पात्र असल्याचे आदेशित करण्यात आले व विहित नियमानुसार भर्ती प्रक्रिया गुणवत्तेचे निकषावर पुर्ण करण्याचे निर्देशित करण्यात आले. दिनांक 26/7/2024 रोजी पारित करण्यात आला….