कानुमातेच्या उत्सवाला उधाण, विसर्जन.

दोंडाईचा /प्रतिनिधी रईस शेख
दोंडाईचा खान्देशातील अनेक कुळांचे दैवत असलेल्या कानबाई मातेच्या उत्सवाला उधाण आले आहे. काल (दि.११) कानबाईचे थाटात आगमन होवून प्रतिष्ठापणा करण्यात आली. रोट पूजनानंतर भाऊबंदकीत प्रसाद म्हणून त्याचे ग्रहण करण्यात आले. आज (दि.१२) मोठ्या भक्तीभावात कानबाईच्या विसर्जन केले. कानबाई उत्सव म्हणजे भाऊबंदकीतील नातेसंबंध अधिक वध्दींगम करणारा हा उत्सव आहे. काल कानबाई मातेची मंगलमय वातावरणात प्रतिष्ठापणा करण्यात आली. गावातून मिरवणूक काढत कानबाईचे थाटात आगमन झाले. विधीवत प्रथेप्रमाणे कानबाईची स्थापन झाली. यासाठी आकर्षक सजावटीची आरास करण्यात आली. मनमोहक विद्युत रोषणाई मुळे कानबाईची प्रतिमा अधिकच उजळून नघाली होती. दुपारी प्रतिष्ठापणा झाल्यानंतर कानबाईला रोटचा नैवैद्य दाखविण्यात आला. रोट पूजनखनंतर भाऊबंदकीत प्रसाद म्हणून त्यांचे ग्रहण करण्यात आली. रात्री पारंपरिक गीते म्हणत जागरण करण्यात आले. महिलांसह पुरुषांनीही फुगड्या खेळत हा आनंदोत्सव साजरा केला. या उत्सवात सहभागी होण्यासाठी शहरात असलेले भाऊबंदकीतील लोक शनिवारीच गावाकडे पोहोचले. यामुळे या उत्सवातील आनंद द्विगुणित झाला होता. आज भक्तीभावने कानबाईला निरोप दिला. गावातून सवाद्य मिरवणूक काढून कानबाईचे विसर्जन झाला. ग्रामीण भागात कानबाईच्या उत्सवामुळे उत्साहात साजरा करण्यात आला.