सप्टेंबरमधील महिलांना २ महिन्यांचे लाभ नाही. . -मंत्री आदिती तटकरेंची स्पष्टोक्ती.

24 प्राईम न्यूज 2 Sep 2024.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील २ महिन्यांचे लाभ मिळणार नसल्याची स्पष्टोक्ती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी केली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ३१ ऑगस्टपर्यंत नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे लाभ एकत्रित जमा झाले आहे, मात्र १ सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्यांचे लाभ मिळणार नाही, तर ज्या महिन्यात ते नोंदणी करणार त्याच महिन्याचे लाभ मिळणार आहे, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.