व्यावसायिक सिलिंडरचे दर ३९ रुपयांनी महागले

24 प्राईम न्यूज 2 Sep 2024.
ऐन सणासुदीच्या तोंडावर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक सिलिंडरचे दर तब्बल ३९ रुपयांनी महागले आहेत. १९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये वाढ करण्यात आली असून त्याच्या किमती १६९१ रुपयांवर पोहोचल्या आहेत. याआधी व्यावसायिक सिलिंडरच्या किमती या १६५२ इतक्या होत्या. आता त्या महागल्याने हॉटेलमधील अन्नपदार्थांच्या किमतींवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.