ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर लालपरीला ब्रेक !एसटी संपाने प्रवाशांचे हाल.

आबिद शेख/अमळनेर. खासगीकरणाला विरोध, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनवाढ व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक मंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. अनेक जिल्ह्यांतून संपाला पाठिंबा मिळत असल्याने लालपरीची चाके थांबली आहेत. गणेशोत्सवाच्या तोंडावर लालपरीला ब्रेक लागून एसटी बस सकाळपासून डेपोमध्येच उभ्या असल्याने बस स्थानकावर दिवसभर शुकशुकाट होता प्रवाशांची व विद्यार्थ्यांचे हाल झाले तीनशे कर्मचारी संपात सहभागी झाले एकही बस बाहेर गावातून आली व गेली नाही एस टी महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले औद्योगिक न्यायालयाने हा अघोषित संप बेकायदेशीर ठरवत संपात सहभागी झालेल्या संघटना व सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर रुजू होण्याचे आदेश दिलेले आहेत.