लोकमान्य विद्यालयात स्वयंशासन दिन उत्साहात संपन्न!

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर: लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालय अमळनेर येथे आज ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता १० वी चे विद्यार्थी चेतन शांताराम चौधरी व तनुष्का महाजन या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक म्हणून काम सांभाळले. तसेच शाळेतील इयत्ता १० वीचे विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून कामाचा अनुभव घेतला. यानंतर विद्यालयात शिक्षकांचा सन्मानार्थ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर महाजन, तर जेष्ठ शिक्षक जितेंद्र चौधरी, सायली देशपांडे, विद्यार्थी मुख्याध्यापक चेतन चौधरी व तनुष्का महाजन हे उपस्थित होते. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी शिक्षक गायत्री गणेश वानखेडे, वैभव रविंद्र देवरे यांनी तर कार्यक्रमाचे आभार खुशी महाजन यांनी केले.