८ रोजी कुणबी पाटील समाज मेळाव्याचे आयोजन. -विद्यार्थी गुणगौरव व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान.

आबिद शेख/ अमळनेर. अमळनेर शहरात प्रथमच कुणबी पाटील समाज मेळाव्याचे आयोजन दि. ८ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. कुणबी पाटील समाज मंडळ, अमळनेर यांनी हा मेळावा आयोजित केला आहे. यावेळी विद्यार्थी गुणगौरव व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान केला जाणार आहे.
गलवाडे रोडवरील ठगुबाई रिसॉर्ट व मंगल कार्यालय येथे दि. ८ रोजी सकाळी १० वाजता हा मेळावा होणार आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री अनिल भाईदास पाटील, खासदार स्मिता वाघ उद्योजक सरजू गोकलाणी, सुभाष पाटील, पोलिस उपनिरीक्षक जे.बी. पाटील, माधुरी पाटील, डॉ. योगेश अहिरे, अमृत पाटील, अॅड.एस.आर. पाटली, नीलेश पाटील, अशोक पाटील जळगाव धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे किशोर पाटील, डॉ. रमेश अहिरराव डॉ. विनोद पाटील, प्रकाश पाटील आनंद पाटील, रामानंद पाटील, स्वींद्र पितांबर पाटील व रवींद्र गौरख पाटील उपस्थित राहतील.
समाजबांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन कुणबी पाटील समाजा मंडळाचे अध्यक्ष शेखर लोटन पाटील, उपाध्यक्ष नवल किसन पाटील सचिव अशोक मुरलीधर पाटील खजिनदार पुरुषोत्तम एकनाथ पाटील सहसचिव शिवाजी पाटील यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी केले आहे.