प्रताप महाविद्यालययेथे प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन. – यश हे महत्त्वाचे नसून यशाचे शिखर गाठणे खूप महत्त्वाचे – डॉ अनिल शिंदे.

अमळनेर खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय व राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) आणि प्रताप महाविद्यालयाचे करियर कौन्सलिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 6 सप्टेंबर 2024 रोजी स्पर्धा आयोजित केली होती. प्रताप महाविद्यालय हे मार्गदर्शन व सुविधा देणारे केंद्र आहे, हे महाविद्यालय अधिकारी निर्माण करणारे केंद्र आहे. विद्यार्थी मेहनत करून चांगल्या पदावर जातील असे मत स्पर्धेच्या समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पी.आय.मा.विकास देवरे यांनी मांडले. प्रस्तुत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.अरुण जैन हे होते. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महाविद्यालयात देशभरातील नामांकित व्यक्ती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात व ही स्पर्धा त्यांना प्रेरणा देण्याचे कार्य करेल.
या वेळी मंचावर खा.शि.मंडळाचे जेष्ठ संचालक मा.डॉ.अनिल शिंदे,श्री.योगेशभाऊ मुंदडे, संस्थेचे अध्यक्ष श्री.जितेंद्र झाबक, संस्थेचे सह सचिव तथा अधिसभा सदस्य उपस्थित होते.