१७ वर्षाखालील फ्री स्टाईल ग्रीक रोमन मुले व मुली कुस्ती स्पर्धेचे आयोजन.

आबिद शेख/अमळनेर. अमळनेर शहरात 15,17 व 20 वर्षाखालील फ्री स्टाईल गिक रोमन व मुलींच्या राज्य अजिंक्य पद कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दिनांक 15 सप्टेंबर रोजी प्रताप महाविद्यालयाच्या इनडोअर हॉल मध्ये ही स्पर्धा संपन्न होणार आहे. विविध वयोगट व वजनीगटातील मुलं-मुली या स्पर्धेत भाग घेऊ शकणार आहेत.
या स्पर्धेसाठी 15 वर्षाखालील फ्री स्टाईल ग्रीक रोमन मुले – मुली या गटात सहभागी होण्यासाठी त्यांचा जन्म २००९ ते २०१० व २०११ या वर्षात झाला असावा व वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच पालकांची संमती असेल तरच या स्पर्धेत स्पर्धकाला भाग घेता येणार आहे. तर फ्री स्टाईल व ग्रीक रोमन मुले यांचा वजनीगट ३८, ४१, ४४, ४८, ५२, ५७, ६२, ६८,७५, ८५ असा आहे. तर मुलींसाठी ३३, ३६, ३९, ४२, ४६, ५०, ५४, ५८, ६२, ६६ किलो ग्रॅम असा वजनीगट आहे.
तर १७ वर्षाखालील फ्री स्टाईल ग्रीक रोमन मुले व मुली –
या गटात २००७, २००८, २००९ वर्षात त्यांचा जन्म झालेला असावा, व वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच पालकांची संमती असेल तरच या स्पर्धेत स्पर्धकाला भाग घेता येणार आहे. तर फ्री स्टाईल व ग्रीक रोमन मुले यांचा वजनीगट ४५, ४८, ५१, ५५, ६० व ६५, ७१, ८०, ९२, ११० असा आहे. व मुलींसाठी ४०, ४३, ४६, ४९, ५३,५७, ६१, ६५, ६९, ७३ किलो ग्रॅम असा वजनीगट आहे.
तर २० वर्षांखालील फ्री स्टाईल ग्रीक रोमन मुले व मुली –
या गटात २००४, २००५, २००६ व २००७ वर्षात त्यांचा जन्म झालेला असावा, व वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच पालकांची संमती असेल तरच या स्पर्धेत स्पर्धकाला भाग घेता येणार आहे. तर फ्री स्टाईल मुले यांचा वजनीगट ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२, ९७, १०२५ असा आहे, ग्रीक रोमन मुले ५५,६०,६३, ६७, ७२, ७७,८२, ८७, ९७, १३० तर मुलींसाठी ५०, ५३, ५५, ५७, ५९, ६२, ६५, ६८, ७२, ७६ किलो ग्रॅम असा वजनीगट आहे.
सदर स्पर्धा दिनांक – 15 सप्टेंबर 2024 रविवार रोजी सकाळी 9 ते 10:30 या वेळात वजन मोजणे सुरू होईल तर 10:30 वाजेपासून पासून कुस्तीस सुरुवात होईल. या स्पर्धेसाठी संपर्क बाळू पाटील -८३२९५१६५००, संजय पाटील – ९०२८३ ०५७३, प्रताप शिंपी, शब्बीर पहिलवान, रावसाहेब पहेलवान, संजय पाटील, भरत पवार यांच्याशी संपर्क साधावा व मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अमळनेर तालुका कुस्तीगीर संघातर्फे करण्यात आले आहे.