प्रसंगावधान राखणाऱ्या खासदार स्मिताताई वाघ व आ राजुमामा भोळे यांनी सुपर फास्ट एक्सप्रेसला जळगांव स्टेशनला २ मिनिटाचा थांबा देत पुढील प्रवास्यांची केली सोय.

0


आबिद शेख/अमळनेर. आज मुंबईहून जळगांव कडे येत असताना खा स्मिताताई वाघ व आ राजुमामा भोळे सकाळी ७:३० वाजता जळगांव रेल्वे स्टेशनला उतरले त्यावेळी रेल्वे स्टेशनवर रोज येजा करणारे नोकरदार वर्ग तसेच कॉलेज ची मुलं मुली विद्यार्थ्यांची परीक्षा होती त्यानी खा स्मिताताई वाघ व आ राजुमामा भोळे यांना माहिती दिली की आज भुसावळ-इगतपुरी ७:१५ वाजताचा मेमो अचानक रेल्वे प्रशासनाने रद्द केला. आम्ही सर्व १५०/२०० प्रवाशांना आता पाचोरा चाळीसगाव जाण्यासाठी एकही गाडी नाही तेव्हा खा स्मिताताई वाघ यांनी डीआरएम भुसावळ यांच्या सोबत बोलण करून गाडी नंबर २२१८४ साकेत चाळीसगाव स्टेशनला पण थांबा देण्याचे निर्देश दिले. त्यावेळी सर्व विद्यार्थिनी व प्रवाश्यानी खा स्मिताताई वाघ व आ राजुमामा भोळे यांचे आभार मानले. मुलींना त्याठिकाणी फोटो काढण्याचा मोह आवरला गेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!