एसटी कामगारांना सरकारने फसवले – श्रीरंग बरगे

24 प्राईम न्यूज 13 Sep 2024.
गेल्या आठवड्यात एसटी कर्मचारी पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी संपावर गेले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर एसटी कर्मचारी संघटनेच्या २३ प्रमुखांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सरसकट ६,५०० रुपयांची पगारवाढ एप्रिल २०२० पासून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. या आश्वासनानंतर हा संप मागे घेण्यात आला होता, पण ही पगारवाढ एप्रिल २०२० पासून नाही, तर सप्टेंबर २०२४ पासून लागू होणार आहे. ही एसटी कर्मचाऱ्यांची घोर फसवणूक असून सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याची टीका महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.