दोंडाईचात मानाचे श्री बाबा दादा आणि विरभंगतसिंग बाप्पाला भावपूर्ण निरोप…

दोंडाईचा प्रतिनिधी/ रईस शेख
शहरात सातव्या दिवशी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. विसर्जनच्या दिवशी श्री दादा गणपती,श्री बाबा गणपती व श्री विरभगतसिंग या तिन्ही मनाचा गणपतीची आझाद चौकात हरी हर भेट झाली. अगोदर दादा आले व बाजूला थांबले. यानंतर बाबा व दादा समोरासमोर आले.आरतीनंतर दादा गणपतीची मूर्ती मार्गस्थ झाली. आणि गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात घोषणा दिली. गणेश विसर्जन मिरवणुकीत दादा बाबा आणि विरभंगतसिंग गणपती यांचा आझाद चौकात हरिहर भेट सोहळा मोठ्या दिमाखात झाला. यावेळी मोठ्या प्रमाणआवर आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करण्यात आली. मानाचे श्री दादा बाबा व विरभंगतसिंग या गणपतींच्या हरिहर भेटीच्या उत्सवाला शत्तकोतर वर्षांची परंपरा या भेट पाहण्यासाठी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होती. मानाच्या गणरायांच्या मिरवणुकीचा मार्ग नवा भोईवाडा,जुना भोईवाडा,आझाद चौक, सराफ गल्ली, गांधी चौक, गाव दरवाजा, एकता चौक, जामा मशिद, इलामपूरा, रानीपुरा, पिंपळ चौक या परिसरात मुख्य मिरवणूक काढण्यात सुरुवात केली होती. त्यांच्या मागोमाग दादा निघाले ही भेट पाहण्यासाठी आजून एकता चौकात मोठी गर्दी झाली. गुलाल व फुलांची उधळण आणि ढोल ताशांच्या गजरात नाचत ही भेट हजारो दोडाईचाकरांनी व ग्रामीण भागातील भाविकांनी डोळ्यात साठवली. विसर्जन मिरवणूकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात
आले होते. तसेच मिरवणूक मार्गावरील संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते.
याप्रसंगी धुळे जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे,अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, अपर तहसीलदार संभाजी पाटील, नगरपालिका मुख्याध्याधिकारी- देवेंद्रसिंग परदेशी, शिरपूर उपविभागीय पो अधिकारी भागवत सोनवणे, पो उप अधीक्षक विश्वजीत जाधव, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, दोडाईचा ठाणेचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी,यांच्यासह ०४ पोलीस निरीक्षक,०७ सहायक पोलीस,११ उपनिरीक्षक, १० सहायक पो उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार १४४, होमगार्ड १४१, एसआरपीएफ चे ०३ प्लाॅटुन,आरसीबी ०३पथक, ०१ स्ट्रायकिंग फोर्स तुकड्या तैनात करण्यात आले होते. मुख्य मिरवणूक मार्ग बंदोबस्त लावण्यात आला होता.