ग्राहक कल्याण फाउंडेशन तर्फे राज्य अन्न आयोग अध्यक्ष ऍड. सुभाष राऊत यांचा सत्कार संपन्न.

आबिद शेख/ अमळनेर
महाराष्ट्र शासनाच्या राज्य अन्न आयोगाचे नव नियुक्त अध्यक्ष(मंत्रिस्तरीय) ऍड. सुभाष राऊत हे जळगाव जिल्ह्याचा शासकीय दौऱ्यावर असतांना अमळनेर येथे माजी उप नगराध्यक्ष अनिल गंगाराम महाजन (आबू दादा ) यांच्या कडे कौटुंबिक भेटीवर आले होते त्यावेळी ग्राहक कल्याण फाउंडेशन च्या वतीने संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विकास महाजन (पारोळा)आणि जिल्हाध्यक्ष हेमंत दादा भांडारकर यांनी राज्य अन्न आयोगाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्या बद्दल मान चिन्ह देऊन सत्कार केला.
या प्रसंगी माजी आमदार शिरीष चौधरी,ग्राहक कल्याण फाउंडेशन चे जिल्हा संपर्क प्रमुख अमळनेर येथील ख्यातनाम विधिज्ञ कुंदन साळुंखे, तालुका अध्यक्ष प्राचार्य रवींद्र माळी, मा.ॲड.आर जी चव्हाण साहेब उपाध्यक्ष,संघटनेचे कार्यकर्ते प्रा. डॉ. सुभाष महाजन,नरेंद्र महाजन,दीपक भोई,रत्नाकर महाजन,सुरेश पाटील, पांडुरंग महाजन,प्रताप पाटील सर,संजय महाजन सर, ॲड.विवेक लाठी आदी उपस्थित होते.