विरोधी पक्षांकडून पंतप्रधानपदाची ऑफर!नितीन गडकरी यांच्या वक्तव्याने खळबळ.

24 प्राईम न्यूज 16 Sep 2024. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्याला विरोधी पक्षाकडून थेट पंतप्रधानपदाची ऑफर मिळाली होती, असे सांगून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. विरोधी पक्षातील एका बड्या नेत्याकडून आपणास ही ऑफर देण्यात आली होती, मात्र केवळ विचारधारेसाठी मी तो प्रस्ताव नाकारला. पंतप्रधानपद हे माझ्याआयुष्यातील ध्येय नाही. मी माझ्या तत्त्वांशी आणि पक्षसंघटनेशी एकनिष्ठ आहे. मी पंतप्रधानपदासाठी या तत्त्वांशी आणि पक्षाशी प्रतारणा करणारनाही, असे स्पष्टीकरणही नितीन गडकरी यांनी दिले.
गडकरी यांना कोणत्या नेत्याने ही ऑफर दिली, याबाबत मात्र त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. “काहीदिवसांपूर्वीची घटना आहे. या घटनेतील नेत्याचे नाव मी तुम्हाला सांगणार नाही. पण, त्याने मला थेट ऑफर देत सांगितले की, जर तुम्ही पंतप्रधानहोणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. पण, मी त्यानेत्याला स्पष्ट सांगितले की, पंतप्रधान होण्यासाठी तुम्हीमला पाठिंबा का द्यावा ? आणि तुम्ही दिलेला पाठिंबा तरी मी का घ्यावा ? पंतप्रधानपद हे माझ्या आयुष्यातील ध्येय नाही. मी एखाद्या पदासाठी पक्ष आणि तत्त्वांशी कधीच प्रतारणा करणार नाही. तत्त्व हेच भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी शक्ती आहे,” असे सांगून गडकरी यांनी भाजप आणि राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडवून दिली आहे.होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. पण, मी त्या नेत्याला स्पष्ट सांगितले की, पंतप्रधान होण्यासाठी तुम्ही मला पाठिंबा का द्यावा ? आणि तुम्ही दिलेला पाठिंबा तरी मी का घ्यावा ? पंतप्रधानपद हे माझ्या आयुष्यातील ध्येय नाही. मी एखाद्या पदासाठी पक्ष आणि तत्त्वांशी कधीच प्रतारणा करणार नाही. तत्त्व हेच भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी शक्ती आहे,” असे सांगून गडकरी यांनी भाजप आणि राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडवून दिली आहे.