कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. – आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च.

आबिद शेख/अमळनेर. रविवारी एका अफवेने शहरात तणाव निर्माण झाला होता, म्हणून आजही असा कुठलाही प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सोमवारी शहरात रूट मार्च केला होता, त्या नंतर अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मंगळवारी अनंतचतुर्थीच्या दिवशी केलेल्या नियोजनाची माहिती देत अमळनेरकरांना शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत करण्याचे आवाहन केले आहे. आज अमळनेर शहरात १ अप्पर पोलीस अधीक्षक, २ उपविभागीय पोलीस अधिकारी, ३ पोलीस निरीक्षक, १५ सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, १०० पुरुष पोलीस कर्मचारी, ५० महिला पोलीस कर्मचारी, १०० होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दलाचे २ प्लाटून, RCP १ प्लाटून आशा सुमारे पावणे तीनशे पोलिसांचा ताफा अमळनेर शहरात आहे, तर अमळनेर शहरावर कॅमेऱ्याची देखील नजर असणार आहे, यात सीसीटीव्ही कॅमेराची मदत घेतली जाणार असून हॅन्ड कॅमेरा देखील मिरवणुकी दरम्यान वापरला जाणार आहे.
दरम्यान यावेळी कोणीही कायदा हातात घेऊ नये व जनतेने कुठल्याही खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी केले आहे.