साई इंग्लिश अकॅडमितर्फे पुस्तकव लेखक ओळख स्पर्धा उपक्रमराबविणार-भैय्यासाहेब मगर.

आबिद शेख/अमळनेर
येथील साई इंग्लिश अकॅडमितर्फे
विद्यार्थ्यांसाठी पुस्तक व लेखक
ओळख स्पर्धेचे आयोजन करण्याचे
निश्चित केले आहे.शासनाने
अमळनेरला पुस्तकांचे गाव म्हणून
नुकतेच घोषित केले आहे,त्यातूनच
साई इंग्लिश अकॅडमिचे संचालक
भैय्यासाहेब मगर यांना सदर कल्पना
सुचली आहे, त्यातून विद्यार्थ्यांना
पुस्तकांची व लेखकांची ओळख
होणार आहे, त्यांच्या या उपक्रमाचे
सर्वत्र कौतुक होत आहे.विद्यार्थ्यांना
50 निवडक पुस्तकांची व लेखकांची
यादी द्यायची आणि त्यावर ही स्पर्धा
घ्यायची.त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांना
पुस्तकांची व त्यांच्या लेखकांची नावे
कळतील व भविष्यात विद्यार्थी ते
पुस्तके वाचतील अशी अपेक्षा स्पर्धेचे
आयोजक भैय्यासाहेब मगर यांनी केली आहे,
लवकरच या स्पर्धा घेण्यात येणार आहेत,
वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सदर उपक्रम
हाती घेण्यात आला आहे.