रोटरी क्लब अमळनेर तर्फे भव्य “खुली मॅरेथॉन स्पर्धा 2024” संपन्न.

आबिद शेख/अमळनेर. रोटरी क्लब अमळनेर “भव्य खुली मॅरेथॉन स्पर्धा 2024” दि.22/9/2024 रोजी आयोजित करण्यात आली. आयोजित स्पर्धा हि युवकांमध्ये सुदृढ शरिरासाठी व्यायामाचे महत्त्व वाढावे, खेळाचे महत्त्व वाढावे या साठी रोटरी क्लब दरवर्षी आयोजित करते. या स्पर्धेला अमळनेर येथील सुप्रसिद्ध आदित्य बिल्डर चे रो. प्रशांत निकम यांच्या तर्फे प्रत्येक सहभागी स्पर्धकाला टीशर्ट दिले तसेच स्वादिष्ट नमकीन चे रो.विजय पाटील, रो.निलेश पाटील यांच्या तर्फे सर्टिफिकेट देण्यात आले. रो.सौरभ जैन यांच्याकडून पिण्याचे पाणी व पार्ले जी चे बिस्कीट मुलांना स्पर्धे दरम्यान
वाटण्यात आले. या स्पर्धेत वाजयी स्पर्धकांना ट्रॉफी, रोख रक्कम व सर्टिफिकेट देण्यात आले तसेच सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. यात मुलान मध्ये प्रथम तिन विजयी
प्रथम श्री. विजय ज्ञानेश्वर सोनवणे
द्वितीय श्री. कृष्णा एकनाथ गायकवाड
तृतीय श्री. रामदास वडार
मुलींमध्ये प्रथम तिन विजयी
प्रथम कु.स्नेहल पाटील
द्वितीय कु. ऋतुजा देवरे
तृतीय कु. नयना मालचे
मुलांमध्ये उत्तेर्जनर्थ श्री. युवराज अमृत गोसावी व श्री. रवींद्र बारेला यांना प्रमाणपत्र व रोख देण्यात आले.
मुलींमध्ये उत्तेर्जनार्थ कु. धनश्री पाटील व कु. भाग्यश्री पाटील यांना प्रमाणपत्र व रोख देण्यात आले.
उदघाटन व बक्षीस वाटप प्रसंगी खा.शी.चे. संचालक रो.विनोदभैया पाटील, श्री.योगेश मुंदडा, श्री.निरज अग्रवाल श्री प्रदीप अग्रवाल तसेच रो.डाॅ.दिलीप भावसार, रो.डाॅ.राहुल मुठ्ठे, रो.डाॅ.शरद बाविस्कर, रो.मक्सुद बोहरी, रो.विवेक देशमुख, रो.दिनेश रेजा, रो. प्रदीप पारेख, रो.महेश पाटील, रो.अविनाश अमृतकार, रो.देवाग शाहा, रो.गोपाल सोनवणे, रो.देवेंद्र कोठारी, रो.धीरज अग्रवाल, रो विजय पाटील, रो निलेश पाटील, रो डॉ कौस्तुभ वानखेडे, तसेच या मॅरेथॉन स्पर्धेस प्रताप महाविद्यालयाचे प्रा.डाॅ.संदिप नेरकर, प्रा.डाॅ.सचिन पाटील, प्रा.श्री.अमृत अग्रवाल यांनी मार्गदर्शन व उत्कृष्ट नियोजन केले.
रोटरी अध्यक्ष रो.ताहा बुकवाला, सचिव रो.विशाल शर्मा हि माहीती पि.आर.ओ. रो. अभिजीत भांडारकर यांनी दिली.