अमळनेर पुन्हा हादरला भर दिवसा घडली घटना.

आबिद शेख/अमळनेर. अमळनेर लहान बहिणीला शाळेत सोडून परत येणाऱ्या अल्पवयीन मुलीला तोंड दाबून रिक्षात निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना २४ रोजी अमळनेर शहरात भरदिवसा सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.
माध्यमिक विद्यालयात १२ वी ला शिक्षण घेणारी एक अल्पवयीन मुलगी तिच्या लहान बहिणीला त्याच शाळेत सोडण्यासाठी २४ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गेली. तिकडून परत येताना ढेकू रोडवरील लक्झरी थांबतात तेथे मागाहून दिनेश रमेश भिल रा शांताबाई नगर हा आला आणि मुलीच्या तोंडावर हात दाबला. समोरून येणाऱ्या रिक्षावाल्याला त्याने सांगितले की आम्हाला पिंपळे रोडवरील आयटीआय ला सोड. रिक्षावाल्याने तेथे सोडल्यावर दिनेशने मुलीला बळजबरीने साथी गुलाबराव पाटील नावाच्या बंद शाळेच्या जिन्यावरून गच्चीवर नेले आणि तेथे त्याने मुलीवर अत्याचार केला.पीडित त्याठिकाणी ओरडत होती परंतु तेथे कोणीच नव्हते. त्यावेळी दिनेशने मुलीला तू माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला आणि तुझ्या घरच्यांना मारून टाकेल. झटापटीत पीडित मुलीचे कपडे फाटले आहेत. दिनेश मुलीला एकटा सोडून गेल्यानन्तर मुलगी घाबरून पळत होती. तिला रस्त्यात तिचे आई वडील भेटले त्यांना हकीगत सांगितल्यावर आईसोबत येऊन मुलीने फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला आरोपी दिनेश विरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल करीत आहेत.