कळमसरेतला वैद्यकीय सेवेतला गरिबांचा देवदूत हरपला……                                                    -डॉ. सतीश सोनवणे यांचे दुःखद निधन —–

0

24 प्राईम न्यूज 26 Sep 2024.

कळमसरे ता.अमळनेर —
कळमसरे येथील गोर गरिबांना चोवीस तास सेवेसाठी तत्पर राहणारे वैद्यकीय सेवेतील देवदूत डॉ. सतीश सोनवणे (वय -68)यांचे आज ता. 25 रोजी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
मूळ गाव मुडी ता.अमळनेर येथील रहिवासी. गेल्या चाळीस वर्षापासून कळमसरे ता. अमळनेर येथे वैद्यकीय व्यवसायासाठी स्थायिक झाले. त्यांचे वडील कै.शिक्षण महर्षी विनायकराव झिपरू पाटील मुडी ग्राम विकास शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष त्यांनी अमळनेर तालुक्यात ज्या गावात शिक्षणाची सुविधा नाही अशा गावात शिक्षण संस्थेचे जाळे विनणारे कै.शिक्षण महर्षी विनायकराव पाटील यांचे ते चिरंजीव. डॉ. सतीश सोनवणे यांच्या घरी सर्व सुख सोयी असताना सेवा परमो धर्म हे ब्रीद घेऊन त्यांनीही आपल्या वडिलांच्या पाऊलांपाऊल ठेवीत वडिलांनी शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या आपण गोर गरिबाना वैद्यकीय सेवा द्यायची या हेतूने कळमसरे सह परिसरातील खेडी, वासरे, खर्दे, पाडसे, नीम, पाडळसरे या गावात सलग चाळीस वर्ष सेवा त्यांनी दिली. ही सेवा देतांना त्यांनी अत्यल्प अशी फी तेव्हढी घ्यायची. प्रतिकूल परिस्थिती असेल तो फी देऊ शकत नसेल तर त्याच्याकडून कधी फी मागितलीही नाही. यामुळे कळमसरेसह परिसरातील गोर गरिबांना वैद्यकीय सुविधा मिळत असल्याने त्यांना कधी याबाबत डॉ. सतीश सोनवणे यांनी आर्थिक संकट येऊ दिले नाही. परिणामी आजारपणात एखादा गोर गरिबाला आर्थिक विवंचना डॉ. सतीश सोनवणे यांनी भासू दिली नाही.त्यांचा या अचानक निधनानंतर कळमसरे सह पंचक्रोशीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ज्या कर्मभूमीत डॉ सतीश सोनवणे यांनी सुमारे चाळीस ते पंचेचाळीस वर्षे वैद्यकीय सेवा केली याच ठिकाणी गावकऱ्यांनी मोठ्या जनसमुदाय संख्येने अंत्ययात्रा काढून सहभागी झाले. तर गावातील सर्वच समाजबांधव अक्षरशः त्यांचा प्रेत यात्रे समयी ढसा ढसा रडले.

आयुष्यात पैसेला महत्व दिले नाही.—-

वैद्यकीय सेवेत काम केल्यावर आपली पत्नी, दोन मुले यांचा चरितार्थ चालेल एव्हढेच कमविले त्यामुळे कुठलीही सुख, सुविधेचा हव्यास या देवदूताने केला नाही. कळमसरे येथे या चाळीस वर्षात डॉ. सतिश सोनवणे यांनी फक्त एक मातीचे लाकडी घर घेतले असून आयुष्यात आपल्या व्यवसायासाठी एक टू व्हीलर (दुचाकी ) तेव्हढी घेतली. मात्र यापलीकडे कुठलाही हव्यास न करता त्यांनी गेल्या चाळीस वर्ष गोर गरिबांची सेवा केली. त्यांच्या आज या निधनाने कळमसरेसह परिसरात शोककळा पसरली आहे.
डॉ. सोनवणे यांचे दोन्ही मुले व सुना शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत,
त्यांनीही आपले आजोबा व वडील यांचा वारसा जोपासत जनसेवेचे व्रत जोपासले आहे. डॉ. सतीश सोनवणे यांच्यासारखा निस्वार्थी वैद्यकीय सेवेतला हिरा आज अखेरचा निरोप घेतल्याने कळमसरे गावात आबाल वृद्ध यांना अश्रू अनावर झालेले पहावयास मिळाले.

कळमसरे ग्रामस्थांनी काढली गावात अंत्ययात्रा ——

डॉ. सोनवणे यांचे दवाखान्यात दुःखद निधनाचा निरोप गावात कळताच ग्रामस्थांनी त्यांच्या दोघे मुलांना आग्रह करीत अंत्यदर्शनाची विनंती केली असता त्यांचा निधनाचा मेसेज व्हायरल होताच यावेळी कळमसरे येथे परिसरातील हजारो नागरिक व महिला दाखल होत ढसा धसा रडली.
यावेळी कळमसरे गावात अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर अमळनेर येथे त्यांच्या मुलांच्या राहत्या घरी सायंकाळी अंत्ययात्रा झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!