न्यू प्लॉट परिसर विकास मंच नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी रोहन आठवले तर कार्याध्यक्षपदी सौरभ जैन..

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर -येथील न्यू प्लॉट परिसर विकास मंचच्या वतीने यंदाही छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरी होणार असून मंचचे अध्यक्ष चेतन राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संपूर्ण कार्यकारिणी घोषित करण्यात आली.
यानुसार अध्यक्षपदी रोहन जगदीश आठवले तर कार्याध्यक्षपदी सौरभ भिकचंद जैन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर उपाध्क्षपदी प्रणित जितेंद्र झाबक,प्रीतराज प्रीतपालसिंग बग्गा,हरिओम विनोद अग्रवाल,खजिनदार प्रशांत लंगरे, सहखजिंनदार प्रसाद जानवे,सेक्रेटरी पवन शर्मा, सहसेक्रेटरी प्रतीक कोराणी,सांस्कृतिक कार्य समिती प्रमुख विशाल सुनिल खीलोसीया,शुभम सुरेश वैष्णव,तंन्मय सुहास बोरकर आदींची निवड करण्यात आली.यावेळी मंचचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान या वर्षी संपूर्ण नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून यात रास गरबा,विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे संपूर्ण न्यू प्लॉट परिसर विकास मंचच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.