भाजपा सहकार सेल आघाडी अमळनेर तालुका मंडल अध्यक्षपदी राजेश वाघ..

आबिद शेख /अमळनेर.
अमळनेर -तालुका भाजपा सहकार सेल आघाडीच्या अमळनेर तालुका मंडल अध्यक्षपदी डांगर बू.येथील राजेश सर्जेराव वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जळगाव जिल्हाध्यक्ष सतीश परशुराम शिंदे यांनी ही नियुक्ती केली आहे.राजेश वाघ हे गेल्या अनेक वर्षापासून भाजपा पक्ष संघटनेत सक्रिय असून आतापर्यंत विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.संघटनेसाठी अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळून पक्ष संघटना वाढीसाठी अमूल्य योगदान दिले आहे.ग्रामीण भागात मोठा जनसंपर्क त्यांचा आहे.सहकार क्षेत्राचा त्यांना विशेष अनुभव आणि अभ्यास असल्याने त्यांची या सेलच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर नियुक्तीबद्दल राजेश वाघ यांचे खासदार स्मिताताई वाघ,भाजप जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज, भाजपा जिल्हा सरचिटणीस भिकेश पाटील,अमळनेर तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,शहराध्यक्ष विजय राजपूत, विधानसभा संयोजक श्रीनिवास मोरे,विधानसभा क्षेत्र प्रमुख शीतल देशमुख,माजी सभापती श्याम अहिरे,माजी जी प सदस्य व्ही आर पाटील, माजी पं.स. उपसभापती बाळासाहेब पाटील, जिजाबराव पाटील,महेंद्र पाटील यासह अनेकांनी अभिंनंदन केले आहे.