लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनसऑगस्ट ते ऑक्टोबरचे पैसे गांधी जयंतीला जमा.

24 प्राईम न्यूज 3 Oct 2024.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सध्या राज्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात ऑगस्ट ते ऑक्टोबरचे असे ३ महिन्यांचे पैसे गांधी जयंतीनिमित्त जमा झाले आहेत. सोबतच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे २ महिन्यांचे मिळून एकूण ३ हजार रुपये देण्याची घोषणादेखील बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. एकत्रित मिळणारे हे पैसे महिलांसाठी दिवाळीचा बोनस ठरणार आहेत.
या योजनेंतर्गत पात्र महिलांना जुलै महिन्यापासून दरमहा दीड हजार रुपये राज्य सरकारकडून देण्यात येत आहे. राज्य सरकारने सर्वात आधी जुलै आणि ऑगस्टचे मिळून ३ हजार रुपये महिलांच्या खात्यात एकत्रित जमा केले होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाभार्थी महिलांना ऑक्टोबर-नोव्हेंबरचे एकत्रित पैसे १० ऑक्टोबरच्या आधी देण्याचे आश्वासन एका कार्यक्रमात बोलताना दिले आहे.