साखरपुड्याला आले आणि लग्न लावून गेले एक अनोखा विवाह सोहळा.

सोनगीर (वार्ताहर) येथील मोईन शेख मोबीन यांचा निजामपूर येथील मुस्ताक शेख यांची मुलगी अल्फीया बी यांचे साखरपुड्यात अत्यंत साध्या पद्धतीने जून्या रीती रीवाजाला बाजूला सारून जास्त गाजावाजा न करता मोजक्या लोकांसमोर विवाह करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. सोनगीर येथील मोबीन शेख अल्लाबक्ष यांचा मुलगा शेख मोईन व निजामपूर येथील शेख मुशताक शेख इब्राहिम यांची मुलगी अल्फियाबी यांचा साखरपुडा दोघांकडील मोजक्या लोकांमध्ये करण्याचे ठरले होते परंतु वर्षी येथील जब्बार मनियार निजामपूर येथील ग्रामपंचायत सदस्य सत्तार मनियार, रज्जाक मनियार ,जब्बार मनियार ,युसुफ मनियार , इब्राहिम मनियार ,अशपाक मनियार, एजाज़ मनियार सोनगीर येथील ग्रामपंचायत सदस्य आरिफ खान मनियार शफीयोद्दीन पठाण, हाजी अख्तर हुसेन ,इब्राहिम शेख मनियार, अमीन मनियार ,मुबारक मनियार व मनियार समाजातील पंचमंडळींनी नवरदेव व नवरी कडील मंडळींना समजावून साखरपुड्यातच विवाह करण्याचे सांगितल्याने नवरीचे वडील मुस्ताक शेख इब्राहिम व नवरदेवाचे वडील मोबीन शेख अल्लाबक्ष व त्यांचे नातेवाईकांनी होकार दिल्याने जुन्या रितीरिवाजाला तिलांजली देऊन ना गाजावाजा ना डीजे ना हळद ना जेवणावळी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा आदर्श विवाह पार पडला नवरदेव आणि नवरीकडील मंडळींनी समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवून प्रेषित मोहम्मद पैगंबरांनी दिलेल्या शिकवणीनुसार विवाह केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.