अजित पवार बारामतीतूनच लढणार-प्रफुल्ल पटेल.

24 प्राईम न्यूज 9 Oct 2024.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आगामी विधानसभा निवडणूक बारामतीमधून लढतील, अशी माहिती पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. मी पक्षाचा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून हे अधिकृत सांगतो की अजित पवार हे बारामतीतून उमेदवार असतील. मी पक्षाची पहिली जागा जाहीर करतो, असे पटेल म्हणाले. त्यामुळे अजित पवार यांच्या उमेदवारीवरून निर्माण झालेला संभ्रम आता दूर झाला आहे.