पाडळसरे धरणाची प्रलंबित कामे करण्याची मागणी.

आबिद शेख/ अमळनेर. पाडळसरे धरण जनआंदोलन समिती पदाधिकाऱ्यासोंबत बैठक.
अमळनेर येथील पाडळसे धरणासाठी शासनाच्यावतीने जाहीर शंभर कोटीचा निधी तातडीने मिळवावा व संबंधित निधी गतिमानतेने १००% खर्च करावा अशी मागणी पाडळसे धरण जनआंदोलन समितीच्यावतीने निम्न तापी प्रकल्प तापी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंतां मुकुंद चौधरी यां यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत करण्यात आली.
तापी पाटबंधारे विभागा अंतर्गत असलेले निम्न तापी प्रकल्प कार्यालयाचे कार्यकारी अभियंता मुकुंदा चौधरी यांच्या कार्यालयात पाडळसरे धरण आंदोलन समितीतर्फे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. याप्रसंगी पाडळसे धरण जन आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी धरणाच्या कामकाजाबाबत व पुनर्वसनाच्या संदर्भातील तसेच नुकत्याच जाहीर झालेल्या उपसा सिंचन योजनांच्या निविदाबाबत व निधि संदर्भातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी धरण समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी, पदाधिकारी हेमंत भांडारकर, अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे, सुनिल पाटील,महेश पाटील आदींनी वर्ष २०२४ याकरिता महाराष्ट्र शासनाच्यावतीने अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेले १०० कोटीची रक्कम प्राप्त झाली किंवा नाही? याबाबत खुलासा मागितला तर नव्याने उपसा सिंचन योजना बाबत जाहीर झालेल्या निविदेबाबतही होत असलेली कार्यवाही व यासाठी आवश्यक तो निधी कसा प्राप्त होणार याबाबतही प्रश्न केले. महाराष्ट्र शासनातर्फे जाहीर निधी तातडीने मिळवावा व जाहीर निविदेतील कामही तातडीने सुरू करावे व प्राप्त होणारा निधी अर्थसंकल्पीय वर्ष संपण्यापूर्वीच १००% खर्च झाले पाहिजे अशी समितीची मागणी यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मांडली. यावेळी उत्तर देताना कार्यकारी अभियंता चौधरी यांनी मागील दोन हजार एकोणवीस ते २०२४ या पाच वर्षात उपलब्ध उपलब्ध झालेले अनुदान व खर्च झालेल्या अनुदानाच्या माहिती दिली तर २०२४-२५ या वर्षा बाबत सांगितले की यातील अंदाजे १० ते ११ कोटी रुपये जिल्हा पातळीवर प्राप्त झालेली असून होत असलेल्या कामांनुसार व जाहीर निवेदनुसार निधी प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक पाठपुरावा व प्रयत्न प्रशासनातर्फे सुरू आहे. प्राप्त निधी पूर्ण खर्च होईल याबाबत प्रशासनाच्यावतीने काळजी घेऊ असेही आश्वासन याप्रसंगी कार्यकारी अभियंता चौधरी यांनी उपस्थित समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी पाडळसे धरण जन आंदोलन समितीचे रामराव पवार,अजयसिंग पाटील,ॲड कुंदन साळुंके आदी पदाधिकारी उपस्थित होते.