एसएनडीटी महाविद्यालयाच्या प्रा. सौ. चारुशीला विश्वनाथ ठाकरे यांचा निवृत्ती निमित्त झालं निरोप समारंभ..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर -येथील श्रीमती रुखमिनिताई महिला महाविद्यालय(एस एन डी टी) महाविद्यालयाच्या मराठी विषयाच्या प्राध्यापिका सौ चारुशीला विश्वनाथ ठाकरे य दीं 30 ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी राजकीय,सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस जे शेख होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रशासकीय अधिकारी प्रा श्याम पवार उपस्थित होते.यावेळी विशेष अतिथी म्हणून खानदेश शिक्षण मंडळाचे संचालक डॉ अनिल शिंदे,उपाध्यक्ष सौ माधुरी पाटील,विश्वस्त सौ वसुंधरा लांडगे,काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ बोरसे,के डी पाटील,संदीप घोरपडे,शहराध्यक्ष मनोज पाटील,दैनिक जनवास्तव चे संपादक किरण पाटील,गजेंद्र साळुंखे,जितेंद्र पाटील,संदीप बोरसे,प्रा भूषण बिर्ला,स्वप्नील गोसावी,के आर ठाकरे,बन्सीलाल भागवत तसेच महाविद्यालयाचे प्रा हुकूमचद जाधव,प्रा सुनिल वाघमारे,प्रा उमेश पाटील,प्रा सौ मंजुषा खरोले,प्रा सौ इंद्रायणी सैदाने,प्रा जयश्री साळुंखे,प्रा सारिका बेन पाटील,ग्रंथपाल शबिना शेख व सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी असंख्य मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून प्रा सौ चारुशीला ठाकरे यांना पुढील निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्यात.सूत्रसंचालन प्रा हुकुमचंद जाधव तर आभार प्रा सुनिल वाघमारे यांनी मानले.