न्यू प्लॉट परिसर विकास मंच नवरात्रउत्सव मंडळातर्फे गुरुवारी मतदार नोंदणी अभियान…

आबिद शेख/ अमळनेर
छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात लागणार बूथ
अमळनेर – न्यू प्लॉट परिसर विकास मंच आयोजित नवरात्रोत्सव मंडळातर्फे आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुपच्या सहकार्याने श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत प्रांताधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी महादेव खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तहसीलदार तथा सहा नोंदणी अधिकारी रुपेशकुमार सुराणा,मुख्याधिकारी तथा अतिरिक्त नोंदणी अधिकारी तुषार नेरकर यांच्या सहकार्याने मतदार नाव नोंदणी अभियान राबविले जाणार आहे.
सदर अभियान संपूर्ण शहरासाठी असून यात नव मतदारांची नोंदणी,दुरुस्ती तसेच इतर सुविधा देखील दिल्या जाणार आहेत.सदर मंडळाकडून नवरात्र उत्सवाच्या प्रांगणात निवडणूक आयोगाच्या वेगवेगळ्या माहितीचे फलक लावून मतदान जनजागृती देखील केली जात आहे.
तरी अमळनेर शहरातील सर्व नागरिकांनी ज्यांचे आपले नाव मतदार यादीत अजून वाढवायचे बाकी आहे. अश्या सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन न्यू प्लॉट परिसर विकास मंच आयोजित नवरात्रोत्सव मंडळातर्फे करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी महेंद्र पाटील मोबा -7020906746 यावर संपर्क साधावा.