कुमावत समाज पदग्रहण समारंभ व सेवानिवृत्त बंधुभगिनीचा सत्कार समारंभ संपन्न.

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर जिल्हा-जळगांव येथे आज अमळनेर तालुका कुमावत समाज मुख्य कार्यकारिणी,युवा कार्यकारिणी व महिला कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ व सेवानिवृत्त बंधुभगिनीचा सत्कार समारंभ दिमाखात संपन्न झाला.प्रमुख अतिथि महाराष्ट्र राज्याचे आपत्ति व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री मा.अनिल भाईदास पाटिल उपस्थित होते व अध्यक्ष या नात्याने कुमावत बेलदार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री श्रीकांत जी परदेशी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मा.अनिल भाईदास पाटिल यांच्या हस्ते कुमावत समाजाचे आराध्य दैवत प्रभु श्री रामचन्द्र व संत शिरोमणि श्री गरवा जी भाटी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव प्रा.डॉ.कुबेर कुमावत यानी केले.आपल्या प्रास्ताविकात प्रा.कुमावत यानी राजस्थान मधुन शेकडो वर्षा पूर्वी महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या मेवाडा कुमावत समाजाचा इतिहास सांगीतला तसेच महाराष्ट्रात अनेक वर्षापासुन दुर्लक्षित,उपेक्षित असलेल्या कुमावत समाजाच्या आर्थिक व सामाजिक स्थितिची जाणीव करून दिली.महाराष्ट्र सरकार ने त्वरित समस्त कुमावत समाजासाठी एक आर्थिक महामंडळ स्थापन करावे अशी आग्रही मागणी करण्यात आली.
मा. मंत्री अनिल भाईदास पाटिल यानी कुमावत समाजाचे महाराष्ट राज्याच्या विकासात असलेले स्थान अधोरेखित करताना समाजाच्या उन्नतिसाठी आपण सकारात्मक असल्याचे सांगीतले.महामंडळ स्थापन करण्याबाबत समाजाने तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा असे आव्हान केले.कुमावत समाजाच्या समाजभवन साठी शहरात कुठे व कशी जमीन उपलब्ध करता येईल याबाबत प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले तसेच समाजाचे संत गरवा जी यांचे शहरातील एखादया चौकात स्मारक निर्मिती बाबत ही प्रयत्नशील असल्या चे सांगीतले.कार्यक्रमाच्या शेवटी योगेश कुमावत यांनी आभार व्यक्त केले.त्यानंतर उपस्थित 1000 समाज बांधवांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली.सदर कार्यक्रमास बहुसंख्या ने तालुक्यातील समाज बंधु-भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी अध्यक्ष श्री योगेश कुमावत,उपाध्यक्ष श्री रविन्द्र उदेवाल,कार्याध्यक्ष श्री दीपक कुमावत,सचिव प्रा.कुबेर कुमावत सहसचिव श्री नरेंद्र कुमावत,श्री रविन्द्र कुमावत,श्री अशोक कुमावत,श्री कैलास कुमावत, श्री सुधाकर कुमावत, श्री सुरेश कुमावत,अविनाश कुमावत, विजय कुमावत भास्करराव कुमावत नांद्री, दिपक कुमावत डांगरी श्री परेश कुमावत, श्रीकृष्ण नागे,गिरीश कुमावत तसेच तालुक्यातील इतर समाज बांधवानी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन पत्रकार श्री संजय पाटील यांनी केले. सदर कार्यक्रम मराठा मंगल कार्यालयात पार पड़ला.