शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत आश्रमशाळा पिंपळे बु. येथील खेळाडूंची नाशिक विभाग स्तरावर निवड…!


आबिद शेख/अमळनेर. श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित, यशवंत माध्य. व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा पिंपळे बु. ता- अमळनेर, जि- जळगाव येथील खेळाडूंनी दि.11/ 10/2024 वार- शुक्रवार रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत उल्लेनीय कामगिरी करत पुढील प्रमाणे यश संपादन केले. 17 वर्षाआतील (मुले) या वयोगटातुन वासुदेव भिमसिंग पावरा यांने 100 मी. धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकविला तर 19 वर्ष आतील (मुले) या वयोगटातुन रवींद्र बाला बारेला – लांब उडी – प्रथम व 400 मी.धावणे- द्वितीय, निलेश रमेश पावरा – 800 मी धावणे – द्वितीय या याप्रमाणे यश मिळविले. तसेच ललित पावरा, रोहित पावरा, जिरमल पावरा, रवीन बारेला, विजय पावरा, संदीप पावरा, रवींद्र बारेला या खेळाडूंनी *4×100 रिले व 4×400 रिले या मैदानी क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविला.* वरील सर्व खेळाडूंची नाशिक विभाग स्तरावर निवड झालेली असून या प्रसंगी जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव श्री.राजेश जाधव यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. सदर विजयी खेळाडूंना आश्रमशाळेतील उच्च माध्यमिक शिक्षक स्वप्निल एच.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या निवडीबद्दल संस्थेच्या अध्यक्षा माईसो श्रीमती विद्याताई पाटील, संस्थेचे सचिव नानासो श्री.युवराज पाटील, प्राथ.मुख्याध्यापक अविनाश अहिरे व माध्य. मुख्याध्यापक उदय पाटील, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिंनदन करून खेळाडूंचे कौतुक केले व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या…!