रतन टाटांचे उत्तराधिकारी नोएल टाटा संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने निर्णय.

24 प्राईम न्यूज 12 Oct 2024. -टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योगपती रतन नवल टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूहाचा उत्तराधिकारी कोण सेल, या चर्चाना शुक्रवारी विराम मिळाला. शुक्रवारी सकाळी झालेल्या टाटा ट्रस्टच्या संचालक मंडळाच्या बैठकीत रतन टाटा यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.नोएल टाटा आतापर्यंत सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टचे विश्वस्त म्हणून कार्यरत होते. आता ते या दोन्ही ट्रस्टचे अध्यक्षअसतील. या दोन्ही ट्रस्टचा टाटा सन्समध्ये मिळून ६६ टक्के हिस्सा आहे. टाटा सन्स ही टाटा समूहाची मूळ कंपनी आहे. टाटा सन्स समूहांतर्गत येणाऱ्या १०० हून अधिक कंपन्यांचा विस्तार जगातील ८० हन अधिक देशांमध्ये

झाला आहे. या सर्व कंपन्यांचे बाजारमूल्य ३४
लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. रतन टाटा
यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
नोएल टाटांशी फोनवरून संवाद साधत शोक
व्यक्त केला होता. नोएल टाटा हेच टाटा ट्रस्टच्या
अध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार मानले जात होते. . कोण आहेत नोएल टाटा ? ६७ वर्षांचे नोएल टाटा हे रतन टाटा यांचेसावत्र बंधू आहेत. माध्यमांपासून दूर राहून पडद्यामागे काम करण्यासाठी ते ओळखले जातात. नोएल टाटा मागील ४० वर्षांपासून टाटा समूहात सक्रियपणे कार्यरत आहेत. टाटा समूहातील अनेक उद्योगांची भरभराट नोएल यांच्याच नेतृत्वाखाली झाली आहे. नोएल टाटा यांची तीन मुलेदेखील टाटा समूहाशी निगडित धर्मादाय संस्थांच्या मंडळांवर आहेत. नोएल टाटा यांचे सुपुत्र नेव्हिल, त्यांची मुलगी लिया टाटा आणि त्यांची दुसरी मुलगी माया टाटा यांच्याकडे टाटांच्या कंपन्यांची जबाबदारी आहे. याआधी नोएल टाटा यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी निवड झाली होती, परंतु नंतर हे पद सायरस मिस्त्रींना दिले होते. मिस्त्री यांच्या हकालपट्टीनंतर एन. चंद्रशेखरन यांच्याकडे जबाबदारी दिली होती.