अखिल भारतीय ग्राहक पंचायत ने सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त अशोक भाऊ जैन यांना राष्ट्रीय उद्योग रत्न या प्रतिष्ठित पुरस्काराने केले सन्मानित ….

0

आबिद शेख/अमळनेर अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांत चे अधिवेशन जळगाव येथे नुकतेच संपन्न झाले. सदर अधिवेशनात खान्देश रत्न ,आंतरराष्ट्रीय व जागतिक स्थरावर जळगाव सुवर्ण नगरी व जैन उद्योग समूह, गांधी तीर्थ चे नाव जागतिक नकाशावर सुवर्ण अक्षरांनी कोरणारे , तिर्थस्वरुप भवरलाल जैन यांचे सुसंस्कृत आचार विचार यांचा वारसा जपत सामान्य शेतकरी व कष्टकरी कास्तकार यांचे शेतशिवरात इरिगेशन पाइप सिस्टीम व ठिबक सिंचन द्वारे माळरान फुलवणारे जैन उद्योग समूह चे अध्यक्ष आदरणीय अशोक भाऊ जैन यांना राष्ट्रीय उद्योग रत्न पुरस्कार जाहीर करीत सन्मानित करण्यात आले होते.
सदरहू राष्ट्रीय उद्योग रत्न पुरस्काराचे वितरण कांताई अध्यक्षीय कार्यालय सभागृह जैन हिल्स येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे जिल्हाध्यक्ष ,जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य जळगाव व धुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग मध्यस्थ पॅनल सदस्य डॉ.अनिल देशमुख, मध्य महाराष्ट्र प्रांत जागरण आयाम प्रमुख श्री विजय जी मोहरीर,प्रांत महिला प्रमुख व जळगाव जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग मध्यस्थ पॅनल सदस्य धुळे ॲड.भारती अग्रवाल, जिल्हा महिला प्रांत प्रतिनिधी सौ.निर्मला देशमुख,जळगाव महानगर महिला संघटक श्रीमती विद्याताई राजपूत, महिला प्रतिनिधी सौ.प्रतिभा सूर्यवंशी जिल्हा संघटक भाई साहेब मकसुद बोहरी , जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य श्री महेश कोठावदे , अमळनेर तालुका अध्यक्ष व महिला उद्योजक सौ.स्मिता चंद्रात्रे ,यावल तालुका अध्यक्ष श्री बाळकृष्ण वाणी,पाचोरा तालुका श्री स्वामी समर्थ महाराज सेवा केंद्राचे यादज्ञाकी सुभाष दादा पाटील,पाचोरा तालुका अध्यक्ष श्री संजय रतन पाटील , पाचोरा वकील संघाचे व ग्राहक पंचायत चे तालुका संघटक ॲड निलेश सूर्यवंशी, सदस्य उदय पवार आदी मान्यवरांचे उपस्थितीत जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल देशमुख यांचे हस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयजयकार करून अष्टगंध तिलक श्री स्वामी समर्थ कृपा आशिर्वादाचे प्रसादाचे नारळ ,शाल,पुष्पगुच्छ आणि सन्मान स्मृती चिन्ह मानपत्र व सुवर्ण महोत्सवी ग्राहक बिंदू श्री क्षेत्र ओझर प्रकाशित स्मरणिका प्रदान करीत गौरवण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रांत महिला प्रमुख ॲड.भारती अग्रवाल यांनी केले तर आपले मनोगतात जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल देशमुख यांनी जैन उद्योग समूह व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नावाने उभारण्यात आलेले गांधी तीर्थ ,म्युझियम , माझे जीवन हाच माझा संदेश आहे हे सांगणारा महात्मा गांधी यांचे भव्य शिल्प रुपी पुतळा म्हणजे गांधी विचारांचे जागतिक स्थरावर दैदिप्यवान कीर्ती क्षेत्र विद्यापीठ असल्याचे विचार करीत आदरणीय अशोक भाऊ जैन यांनी तिर्थस्वरुप भवरलाल जैन यांचे वारसा जपत सामान्य शेतकरी ,कष्टकरी यांचे शेत शिवरात जैन इरिगेशनचे पाइप व ठिबक सिंचननाने अक्षरशः माळरान फुळवणारे स्वप्न प्रत्यक्षात उतरविले असून त्याची प्रत्यक्ष पाहणी करून व आंतरराष्ट्रीय व जागतिक पातळीवर जैन उद्योग समूह ची घेतली गेलेली अभिमानास्पद कार्याची दखल विचारात घेत कर्तुत्ववान अशोक भाऊ जैन यांना राष्ट्रीय उद्योग रत्न पुरस्कार जाहीर करीत आज त्याचे वितरण होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करीत ह्या पुरस्कारासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचे परमेश्वरी अधिष्ठान लाभले असल्याचा आवर्जून उल्लेख केला ह्या सर्व आयोजनचाचे श्रेय ईश्वराचे असल्याचे भाव प्रगट केलेत. तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे संस्थापक अध्यक्ष ग्राहक तीर्थ बिंदुमाधव जोशी यांचे व भवरलालजी जैन यांचे स्नेहपूर्ण ऋणानुबंध चां उल्लेख करीत अखिल भारतीय ग्राहक पंचायत चां गेले पन्नास वर्षातील कार्याचा आढावा घेत जिल्ह्यातील विस्तारित प्रगती आलेखही सादर केला.
सदर प्रसंगी यावल तालुका अध्यक्ष श्री बाळकृष्ण वाणी संपादित ज्येष्ठ नागरिक संघ दैनिक यावल समाचार अंकाचे ही प्रकाशन अशोक भाऊ जैन यांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले.
आदरणीय अशोक भाऊ जैन यांनी आपले कृतज्ञतापूर्ण भाव व्यक्त करीत सातत्यपूर्ण कार्य करीत अखिल भारतीय ग्राहक पंचायत चा कार्य प्रगती आलेख उंचावणारा असून ग्राहक तिर्थ बिंदुनाना माधव जोशी यांचे शोषण मुक्त समाज निर्मितीचे स्वप्न येणाऱ्या पन्नास वर्षात अखिल भारतीय ग्राहक पंचायत नक्कीच पूर्णत्वास नेऊन साकार करील अशा आशावाद त्यांनी व्यक्त केला व संघटनेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्यात.
तसेच श्री राम जन्म भूमी अयोध्या येथे श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली मोरे दादा यांचा सहवास लाभल्याचे उल्लेख करीत भूमिपुत्र रामलला विशेष अंक उपस्थितांना त्याचे स्वहस्ते सप्रेम भेट म्हणून दिलेत .
मुक्त चिंतनात जैन हिल्स गांधी तीर्थ बद्दल उल्लेख करीत ॲड.भारती अग्रवाल यांनी जगातील आठवा अजुबा असल्याचे तर सौ.निर्मला देशमुख यांनी महात्मा गांधी चे भव्य शिल्प पुतळा हा गुजरात मधील लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे भव्य पुतळ्याची व परिसर याची आठवण करून देणारी असून हे आपल्या खान्देश चे वैभव गौरव स्थान असल्याचा भाव व्यक्त केला तर जिल्हा संघटक श्री भाई मकसुद बोहरी यांनी परम पूज्य साने गुरुजींच्या सुदंर आठवणीचे समीक्षा लेख समावेश असलेले यावल समाचार आणि राजा मंगळवेढेकर लिखित “साने गुरुजींची जीवन गाथा ” मा.अशोक भाऊ जैन यांना सप्रेम भेट दिली. जैन हिल्सवर गांधी तीर्थ येथे गांधी विचारांचं आदर्श वास्तू निर्मिती करत समाजापुढे महात्मा गांधी यांचा आदर्श चिरकाल अमर केल्या बद्दल जैन उद्योग समूहाचे ऋणनिर्देश करण्यात आले.
प्रांत जागरण आयाम प्रमुख श्री विजय जी मोहरीर यांनी दीपस्तंभ अशोक भाऊ जैन यांची ही अविस्मरणीय अशी भेट असून आदरणीय अशोक भाऊ जैन यांचे व त्यांचे स्विय सहाय्यक मनीष शाह यांचे प्रती कृतज्ञता भाव व्यक्त केलेत जळगाव जिल्हा कार्यकारिणी यांचेही आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!