बाल शिवसैनिक झाला तालुकाप्रमुख..

एरंडोल (प्रतिनिधि) कासोदा येथील बाल शिवसैनिक रवींद्र चौधरी यांची उद्धव ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. चौधरी हे बालपणापासून शिवसेनेचे काम करीत असून गेल्या दहा वर्षापासून ते तालुका उपप्रमुख म्हणून कार्यरत होते. रवींद्र चौधरी यांनी एरंडोल येथे शासकीय विश्रामगृहावर १ फेब्रुवारी २०२३ रोजी पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले की, माझी तालुकाप्रमुख म्हणून निवड करून माझ्यावर पक्षश्रेष्ठींनी जो विश्वास टाकला आहे त्याला मी कदापी तडा जाऊ देणार नाही या संधीचे सोने करून उद्धव ठाकरे शिवसेनेला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नांचे पराकाष्टा करणार.
या वार्तालाप प्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक रमेश महाजन जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, जि प चे माजी सदस्य नानाभाऊ पोपट महाजन माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, गुलाबसिंग पाटील, गजानन पाटील, कुणाल महाजन, अतुल महाजन, परेश बिर्ला, अमोल भावसार, मोहन महाजन आदी शिवसैनिक उपस्थित होते.