घड्याळ अजितदादांकडेच. शरद पवार गटाची याचिका फेटाळली.

24 प्राईम न्यूज 25 Oct 2024.

घड्याळ अजितदादांकडेच शरद पवार गटाची याचिका फेटाळली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयानेगुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारगटाला मोठा दिलासा दिला. अजितदादा गटाला घड्याळ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवण्यास मनाई करीत हे चिन्ह गोठवण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका शरदचंद्र पवार पक्षाने केली होती. ही याचिका न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने फेटाळली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट घड्याळ चिन्हाचा वापर करू शकतो, मात्र त्यांना निवडणूक चिन्हाबरोबर हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची. सूचना द्यावी लागेल, असे खंडपीठाने नमूद केले आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या १९ मार्च रोजीच्या आदेशानुसार सूचनेसह (हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची सूचना) आम्ही निवडणुकीत घड्याळ चिन्हाचा वापर करू, असे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश खंडपीठाने अजितदादा गटाला दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत या आदेशाचे पालन झालेच पाहिजे, असेही नयायालयाने अजित पवार गटाला खडसावले आहे.