मोटरसायकलला कट लागल्यावरून वाद, आमलेश्वरनगरमधील तरुणाचा खून.

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर : मोटरसायकलने कट मारल्याच्या वादातून एकाला मारहाण केल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना जळोद अमळगाव शिवारात दि. 3 ऑक्टों रोजी पहाटे 2 वाजता घडली.
याबद्दल सविस्तर माहिती अशी की, विकास प्रवीण पाटील वय ३० रा.अमलेश्वर नगर हा आपल्या मित्रांसह पिंगळवाडे येथे तमाशा पाहण्यासाठी गेला होता. मोटरसायकलला कट मारल्यावरून मोटरसायकलचे इंडिकेटर तुटले. या वरून दोन गटात अमळगाव जळोद रस्त्यावर मारामारी झाली. या मारामारीत विकास याचा मृत्यू झाला. ही घटना दि 3 ऑक्टो रोजी पहाटे 2 वाजेच्या सुमारास घडली. घटनेचे वृत्त कळताच सहाययक पोलीस निरीक्षक जीभाऊ पाटील , संजय पाटील यांनी घटना स्थळी भेट दिली. विकासचा मृतदेह शवविच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. फरार आरोपींचा शोध मारवड पोलीस शोध घेत असताना जामनेर पर्यंत लिंक लागताच एलसीबी पथकाने अवघ्या सहा तासात जामनेर परिसरातून संशयित आरोपी नितीन पवार , अमोल कोळी , हर्षल गुरव याना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.