जळोद जिल्हा परिषद गट क्रांतीकारकांचे योगदान आणि विविध देवस्थानांचे वैभव लाभलेला हा परिसर कायम भाजपच्याच सोबत. – अनिल भाईदास पाटील यांना संपुर्ण गटातून भरभरून असे मतदान होईल…. – ऍड व्ही आर पाटील

0

आबिद शेख/अमळनेर. अमळनेर-सर्व जाती धर्मातील, सर्व क्षेत्रातील आणि सर्व स्तरातील लोक जेथे मिळून मिसळून राहतात तो गट म्हणजे आमचा कळमसरे- जळोद जिल्हा परिषद गट क्रांतीकारकांचे योगदान आणि विविध देवस्थानांचे वैभव लाभलेला हा परिसर कायम भाजपच्याच सोबत राहिला असून यंदाही महायुतीच्याच पाठीशी असल्याने महायुतीचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांना संपुर्ण गटातून भरभरून असे मतदान होईल असा विश्वास भाजपाचे माजी जि प सदस्य ऍड व्ही आर पाटील यांनी व्यक्त केला आहे.
या धार्मिक आणि क्रांतिकारकांच्या भूमीला विकासाभिमुख करण्याचे काम मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केले असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.आणि विकास केला म्हणून जनतेने देखील त्यांना साथ नक्कीच दिली पाहिजे आणि देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.विकास कामा संदर्भात अधिक बोलताना ते म्हणाले की पाडळसरे येथील निम्न तापी प्रकल्पाला मिळालेली गती असेल तसेच या प्रकल्पाला मिळालेली 4800 कोटींची सुप्रमा असेल किंवा त्यानंतर केंद्रीय योजनेसाठी पाठपुरावा असेल यासाठी अनिल दादांचे परिश्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत.याव्यतिरिक्त गावोगावी नवीन पाणीपुरवठा योजना देऊन पाणी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न नक्कीच झाला आहे.हिंगोणे येथे बोरी नदीचे पाणी अडविण्यासाठी मृदू व जलसंधारण अंतर्गत 134 कोटींचे दोन सिमेंट बंधारे म्हणजे शेतकरी बांधवासाठी कृषी संजीवनी चा मार्गच ठरला आहे.भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानांचा दर्जा उचविण्यासाठी कपिलेश्वर व्यतिरिक्त नंदगाव येथील श्रीराम मंदिरासाठी तब्बल 2 कोटी निधीतून मोठा कायापालट केला,याव्यतिरिक्त या गावासाठी ग्रा प इमारत व सभामंडप यासाठीही निधी दिला,अंतुर्लीत कार्तिक स्वामी मंदिरासाठी सभामंडप देऊन भाविकांची सोय केली.गोवर्धन येथील काळभैरव मंदिरात सरंक्षण भिंत देऊन मंदिर सुरक्षित केले. याव्यतिरिक्त जळोद येथे 1 कोटी,हिंगोणे खु.प्र.ज.1 कोटी ,सावखेड्यात 90 लक्ष,कलमसरेत 56 लक्ष,कलालीत 28 लक्ष,आमोदेत 55 लक्ष,गंगापूरीत 42 लक्ष,प्र.डांगरीत 55 लक्ष,तांदळीत 35 लक्ष,तासखेड्यात 50 लक्ष,नालखेडा 40 लक्ष,निंभोरा 55 लक्ष,पाडळसरे 30 लक्ष,मठगव्हान 35 लक्ष,मारवड 70 लक्ष,मेहरगाव 50 लक्ष,रंजाने 35 लक्ष,रुंधाटी 45 लक्ष,हिंगोणे 40 लक्ष असा भरघोस निधी देऊन यातून रस्ते काँक्रीटीकरणं,शेत रस्ते, प्रवेशद्वार, सुशोभीकरण, शाळा खोली बांधकाम,सभा मंडप,ग्रामपंचायत कार्यालय, संरक्षण भिंत,भक्तनिवास, पेव्हर ब्लॉक सुशोभीकरण, स्मशानभूमी,सांत्वन शेड यासारखी कामे पूर्ण झालेली आहेत.गटातील इतर गावांना देखील न्याय देण्यात ते कुठे कमी पडलेले नाहीत.
गावोगावी असा शाश्वत विकास या भूमीपुत्राने करून दाखविला असल्याने विकास आणि महायुती या दोन गोष्टीं या गटातून त्यांना मतदान करण्यासाठी पुरक असून प्रचार दौऱ्यात प्रत्येक गावातून त्यांना प्रतिसाद मिळाला आहे. गटातील प्रत्येक व्यक्ती व आमचा संपूर्ण भाजप परिवार त्यांच्या सोबत आहे. मतदानाच्या दिवशी निश्चितच त्यांच्यावर मतांचा भरभरून असा पाऊस पडेल असा विश्वास व्ही आर पाटील यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!