आता ४९ उमेदवारांना शस्त्रधारी अंगरक्षक

24 प्राईम न्यूज 7 Nov 2024.
विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढविणाऱ्या जिल्ह्यातील ११ मतदार संघातील ४९ उमेदवारांना निवडणूक काळासाठी शस्त्रधारी अंगरक्षकाची सुरक्षा पुरविली जाणार आहे. याबाबतचा निर्णय जिल्हास्तरीय समितीने घेतला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यात निवडणूक काळात झालेल्या घटनांच्या
पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी आणि पोलीस
अधीक्षक यांच्या जिल्हास्तरीय समितीने निवडणूक
लढविणाऱ्या उमेदवारांच्या जीवीताला असलेल्या
धोक्याबाबत तपासणी करून एक शस्त्रधारी अंगरक्षक
पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. यात जिल्ह्यातील
११ मतदारसंघातील ४९ उमेदवारांना अशाप्रकारची
सुरक्षा उद्या दि. ६ पासून पुरविली जाईल अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी दिली. तसेच हीसुरक्षा केवळ निवडणूक काळासाठी राहणार असून भविष्यात पुन्हा सुरक्षा देण्याच्यादृष्टीने जिल्हास्तरीय
समिती आवश्यक तो निर्णय घेणार असल्याचे डॉ.
रेड्डी यांनी सांगितले. यांना पुरवली जाणार सुरक्षा
चोपडा – प्रा. चंद्रकांत सोनवणे, प्रभाकर सोनवणे, रावेर – अमोल जावळे, धनंजय चौधरी, अनिल चौधरी, दारा मोहम्मद, भुसावळ – डॉ. राजेश मानवतकर, जळगाव शहर – डॉ. अनुज पाटील, जयश्री महाजन, शैलजा सुरवाडे, राजूमामा भोळे, कुलभूषण पाटील, जळगाव ग्रामीण – गुलाबराव देवकर, मुकुंदा रोटे, अमळनेर – शिरीष हिरालाल चौधरी, डॉ. अनिल शिंदे, एरंडोल – डॉ. सतीश पाटील, अमोल चिमणराव पाटील, ए.टी. पाटील, चाळीसगाव उन्मेश पाटील, मंगेश चव्हाण, पाचोरा – वैशाली सूर्यवंशी, सतीश बि-हाडे, अमीत तडवी, प्रताप हरि पाटील, मांगो पगारे, अमोल शिंदे, अमोल शांताराम शिंदे, निळकंठ पाटील, मनोहर ससाणे, दिलीप वाघ, वैशाली किरण सूर्यवंशी, जामनेर दिलीप खोडपे, मुक्ताईनगर – अनिल मोरे, अनिल गंगतीरे, अॅड. रोहीणी एकनाथ खडसे, अशोक जाधव, संजय ब्राम्हणे, अर्जुन पाटील, ईश्वर सपकाळे, उमाकांत मराठे, रोहीणी कवडे, रोहीणी खडसे, रोहीणीताई खडसे, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत पाटील, जफर अली मकसूद अली, विनोद सोनवणे आणि सुरेश तायडे यांना सुरक्षा पुरविली जाणार आहे.