जो आपल्या मातीचा तोच आपल्या जातीचा.      -मंत्री अनिल पाटलांसाठी एकवटले अमळनेरचे असंख्य माजी नगरसेवक, शहरात मताधिक्य देण्याचा निर्धार.

0

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर-“जो आपल्या मातीचा, तोच आपल्या जातीचा”एकच सूत्र भूमिपुत्र असा नारा अमळनेर शहरातील असंख्य माजी नगरसेवकांनी देत या मातीसाठी आम्ही एकवटलो असून शहरात महायुतीचे उमेदवार अनिल पाटलांना प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला.
महायुतीचे उमेदवार तथा मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील सर्व माजी नगरसेवकांची बैठक नुकतीच पार पडली.यावेळी नगरसेवकांनी या मातीशी इमान राखणे हेच आमचे ध्येय असून आम्ही विविध प्रभागात एकमेकांचे विरोधक असलो तरी केवळ या भूमीसाठी विकासपुरुष ठरलेले भूमिपुत्र अनिल दादा यांच्यासाठी आम्ही आमच्यातील मतभेद बाजूला ठेऊन एकसंघ राहून काम करू,अजूनही कुणी विरोधात असेल तर त्यांनाही आपलेसे करू,विकासाचे मोठे व्हिजन अनिल पाटील यांच्याकडेच असल्याचे सिद्ध झाले असून आपल्या पुढच्या पिढीला काहीतरी चांगलं दाखवायचं असेल तर अनिल पाटलांशीवाय पर्याय नाही हेच आम्ही प्रत्येक प्रभागातील नागरिकांना सांगू असे सर्वांनी सांगितले.
तर मंत्री अनिल पाटील सर्वाना विनंती करताना म्हणाले की आता फक्त पंधरा दिवस आपल्या हातात असून आपली स्थिती भक्कम असली तरी गाफील न राहता सर्वांनी तळमळीने कामाला लागावे,तुम्ही फक्त पंधरा दिवस मला साथ द्या मी पुढील पाच वर्षे तुमच्यासाठी वाहून घेईल अशी ग्वाही अनिल पाटलांनी दिली.
दरम्यान सर्व नगरसेवकांनी दाखविलेले प्रेम पाहून अनिल पाटील देखील भारावून गेले होते.तुमचं हे प्रेम म्हणजे माझ्यासाठी ऊर्जेचा स्त्रोत असून शहरात आपण कोणत्याही परिस्थितीत मोठ्या प्रमाणात प्लस राहू असा विश्वास व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!