महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशनकडून डॉ. शिंदे यांना पाठिंबा…

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर:- अमळनेर विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांना विविध स्तरातून पाठिंबा मिळत असून महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशनकडून ही पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन जळगाव जिल्हाध्यक्ष दिपक पाटील यांच्यामार्फत डाॅ. अनिल शिंदें यांना भेटून पाठिंब्याचे पत्र ९ रोजी देण्यात आले. डॉ. शिंदे हे युवा पिढीसाठी मार्गदर्शक असणारे सेवाभावी उमेदवार असून त्यामुळेच डाॅ. शिंदेना पाठिंबा दिल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी बापु पाटील, मनिष पवार, स्टुडंट्स असोसिएशनचे पदाधिकारी, महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.