महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांना ग्रामीण भागात मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद.. -ग्रामीण महिलांनी डॉक्टर शिंदे यांचा औक्षण करत दिल्या शुभेच्छा..

आबिद शेख/अमळनेर . सध्या अमळनेर तालुक्यात अमळनेर विधानसभा निवडणूकीचे महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अनिल नथु शिंदे यांना ग्रामीण भागामध्ये नागरिक बंधू भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे..
महाविकास आघाडीचे उमेदवार
डॉ. अनिल नथ्थु शिंदे यांच्या आज सकाळी प्रचारार्थ वाघोदा, निसर्डी, खडके, रणाईचे बु , रणाईचे खु., रणाईचे तांडा, अंचलवाडी, लोंढवे, या गावात दौऱ्यामध्ये ग्रामस्थांशी संवाद साधत शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा केली गावकऱ्यांचे उत्तम प्रतिसाद मिळत आहे… या प्रचार दौऱ्यादरम्यान डॉ. अनिल शिंदे यांचे जोरदार स्वागत करण्यात येऊन घरोघरी माता भगिनींनी औक्षण करत विजयाचा आशीर्वाद दिला. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी, मान्यवर, शहरी व ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.