बेरोजगारांना ४ हजार रुपये भत्ता, अडीच लाख जागांसाठी भरती प्रक्रिया राबवणार, महाविकास आघाडीचे युवकांना आश्वासन. -मतदारसंघातील युवकांची देखील डॉ. शिंदेनाच साथ, युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष महेश पाटील यांचे प्रतिपादन.

आबिद शेख/अमळनेर

महाराष्ट्रासह देशात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होताना दिसत आहे. मात्र महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास युवकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्याचे आश्वासन दिल्याने राज्यात महाविकास आघाडीला युवकांची साथ लाभणार सून तालुक्यातून ही आघाडीचे उमेदवार डॉ. शिंदे यांना युवकांची खंबीर साथ मिळणार असल्याचे मत युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष महेश दगडू पाटील यांनी व्यक्त केले आहे.
महाविकास आघाडीने सत्तेत आल्यास विविध कल्याणकारी योजना राबविण्याचे आश्वासन जनतेला दिले आहे. त्यात ही युवकांसाठी भरीव घोषणा करण्यात आल्या आहेत. सुशिक्षित बेरोजगारांना चार हजार रुपये महिना भत्ता देणार, अडीच लाख रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवणार, युवा आयोगाची स्थापना, शिष्यवृत्ती निधी वाढवणार, एमपीएससीच्या परीक्षा देण्यासाठी एकदाच शुल्क आकारून स्मार्ट कार्ड देणार यांसह मोठ्या घोषणा आघाडीकडून करण्यात आल्या आहेत. ह्या घोषणा भावल्याने राज्यात महाविकास आघाडीला मोठी साथ युवकांची लाभत आहे.
त्याचमुळे अमळनेर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांना युवकांचा मोठा पाठिंबा असून युवकांच्या साथीने मतदारसंघात पुन्हा परिवर्तन घडवणार असल्याचा विश्वास युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष महेश पाटील यांनी व्यक्त केला आहे.