लालपरीचा प्रवास महागण्याची चिन्हे . -महामंडळाचा १४.१३ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव

24 प्राईम न्यूज 2 Dec 2024.
राज्यातील प्रवाशांची लाडकी लालपरी अर्थात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेचा प्रवास महागण्याची चिन्हे आहेत. एसटी महामंडळाने तिकीट दर्शत १४.१३ टक्के दरवाढीचा प्रस्ताव तयार करून तो राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवल्याचे समजते. राज्यात नवे सरकार स्थिरस्थावरझाल्यावर या प्रस्तावावर निर्णय घेण्यात येईल. राज्य सस्कारने एसटीच्या तिकीट भाडेवाढीचा प्रस्ताव मंजूर केल्यास एसटी प्रवाशांच्या खिशाला झळ बसू शकते.
मागील काही वर्षांपासून एसटी महामंडळ आर्थिक संकटांना तोंड देत आहे. महामंडळाने २७ नोव्हेंबर २०२१ रोजी शेवटची भाडेवाढ केली होती. तेव्हापासून म्हणजेच गेल्या ३ वर्षापासून एसटीच्या भाड्यात वाढ झालेली नाही. त्यातचझाल्यावर या प्रस्तावावर निर्णय घेण्यात येईल. राज्य सरकारने एसटीच्या तिकीट भाडेवाढीचा प्रस्ताव मंजूर केल्यास एसटी प्रवाशांच्या खिशाला झळ बसू शकते.मागील काही वर्षांपासून एसटी महामंडळ आर्थिक संकटांना तोंड देत आहे. महामंडळाने २७ नोव्हेंबर २०२१ रोजी शेवटची भाडेवाढ केली होती. तेव्हापासून म्हणजेच गेल्या ३ वर्षापासून एसटीच्या भाड्यात वाढ झालेली नाही. त्यातचमहायुती सरकारने राज्यातील महिलांना निम्म्या तिकीटांत प्रवास, ज्येष्ठ, विद्यार्थी आदींना प्रवासात सवलती दिल्याने एसटीवर मोठा आर्थिक ताण पडला आहे. या सवलतींवर एसटीला वेगळे पैसे खर्च करावे लागतात. एसटीचे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ या सवलतींमुळे पूर्णपणे बिघडल्याने एसटी महामंडळापुढे आता भाडेवाढ करण्यावाचून पर्याय उरलेला नाही, असे एसटी महामंडळातील अधिकान्यांचे म्हणणे आहे.