लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांची प्रतीक्षा..

आबिद शेख/अमळनेर. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फलदायी ठरल्याने महायुतीचे सरकार सत्तेवर आले. लाडक्या बहिणींमुळे मतदानाचा टक्कासुद्धा वाढला. त्यामुळे महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या योजनेतील सहाव्या हप्त्याची महिलांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. शिवाय, महायुतीने दिलेल्या आश्वासनानुसार प्रतिमहिना २,१०० रुपये मिळण्याची वाट बघत आहेत. त्यामुळे आपल्या खात्यात पैसे कधी जमा होणार, याचीच चर्चा सर्वत्र रंगली आहे.
राज्यभरात महायुतीला घवघवीत यश मिळाले असून आता थोड्याचदिवसांत सरकार स्थापन होणार आहे. महायुती व महाविकास आघाडीकडून सत्तेत आल्यास योजनेच्या पैशांत आणखी वाढ करण्याचे सांगितले जात होते. आता राज्यात महायुतीची सत्ता आल्यामुळे लवकरात लवकर २,१०० रुपयेमिळतील, या प्रतीक्षेत सर्वच आहेत. मात्र त्यासाठी आणखी वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. तशा चचदिखील ठिकठिकाणी ऐकावयास मिळत आहेत.
महायुतीतील शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही मित्रपक्षांनाअनपेक्षित यश मिळाल्याने महायुतीचा सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर झाला आहे. त्यात लाडकी बहीण योजना कार्ड चालल्याचे बोलले जात आहे. कारण, महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना प्रतिमाह दीड हजार रुपयांऐवजी २,१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांना आता त्या एकवीसशे रुपयांची प्रतीक्षा लागली असून आगामी महिन्यापासून ६०० रुपयांची वाढ त्यात होणार असल्याने सध्या महिला खूश म आहेत. आचारसंहितेच्या काळात योजनांचा लाभ देता येत नसल्याने निवडणुका संपताच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमाकरण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. त्यामुळे आश्वासनपूर्तीकडे लाभार्थीचे लक्ष लागले आहे.