तुषार चौधरी यांच्या खुनातील प्रेमीयुगुलाला ११पर्यंत पोलीस कोठडी.

आबिद शेख/अमळनेर. -अमळनेर तुषार चौधरी यंच्या खून प्रकरणातील आरोपी प्रेमी युगुलाला ११ तारखेपर्यंत न्यायालयाकडून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तुषार चौधरी यांचा मंगरूळ एमआयडीसीत दगडाने मारून खून करण्यात आला होता.
दरम्यान दोंडाईचा तालुक्यातील मालपूर येथील सागर बापू चौधरीयाचे तुषार यांची पत्नी पुजाशी प्रेमसंबंध होते. त्या दोघांना लग्न करायचे असल्याने सागरने अडथळा बाजूला केला. दरम्यान, पोलिसांनी सागर व पूजा या प्रेमी युगुलाला अटक केली होती. त्यांना पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोघांना ११ तारखेपर्यंत कोठडी सुनावली आहे.