अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा खून; पत्नीसह प्रियकर गजाआड…

0

आबिद शेख/अमळनेर. -तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसी परिसरात तुषार चिंधू चौधरी वय ३७ रा. मारवड ता.अमळनेर ह.मु. प्रताप मील, अमळनेर या तरूणाचा मृतदेह शुक्रवारी ता.६ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता आढळल्याने खळबळ उडाली होती. तुषार हा मूळचा मारवड ता. अमळनेर येथील रहिवासी असून तो अमळनेर येथे प्रताप मिल कंपाऊंड मध्ये राहत होता. तो शेत व प्लॉट विक्रीचा व्यवसाय करतो. ता. 5 रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास तो आई रंजनाबाई व पुजा यांना दहा मिनिटात येतो असे सांगून घराबाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत तुषार घरी आला नाही. म्हणून त्याचा सर्वत्र शोध घेतला होता. त्याचे लोकेशन काढले. असता ते मंगरूळ पर्यंत दाखवत होते. मात्र तुषारचा पत्ता लागला नाही. सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास तुषार मंगरूळ येथे जखमी अवस्थेत पडला असल्याचे समजले. तुषार याच्या कपाळावर डोक्यावर दगडाने वार केलेला होता. त्याच्या डाव्या कानाजवळ डाव्या डोळ्याजवळ गंभीर जखमा होत्याघटनास्थळी प्रभारी डीवायएसपी धनंजय वेरूळ पोलीस निरीक्षक विकास देवरे, पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल, हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे, मिलिंद बोरसे, सागर साळुंखे, पोलिस पाटील भागवत पाटील यांनी भेट दिली. तुषार याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. फॉरेन्सिक पथक, ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले.

आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तुषारच्या घरापासून तर मंगरुळपर्यंत रस्त्यात असलेले सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात तुषार हा एका जणाबरोबर मोटरसायकलवर आलेला दिसून आला. जाताना मात्र तो एकटा जातांना दिसला. संशयित आरोपी हा पोलिसांच्या नजरेत आला असता त्याला पकडण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले. संशयित आरोपी निश्चित करण्यासाठी एलसीबी पोलिसांचे सहकार्य लाभले. अनैतिक संबंधातून खून –

यात संशयित आरोपी याने अनैतिक संबंधातून तरूणाचा खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यानुसार पोलीसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे फरार झालेला संशयित आरोपी प्रियकर सागर चौधरी वय-30 रा. मालपूर ता. शिंदखेडा जि. धुळे आणि मयताची पत्नी पुजा तुषार चौधरी रा. प्रताप मिल, अमळनेर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी आरोपी सागर चौधरी याला पोलीस प्रशासनातील कर्मचारी कैलास शिंदे, मिलिंद सोनार, अमोल पाटील, शेखर साळुंखे, नीलेश मोरे, विनोद सदाशिव, उज्वल म्हस्के, नितीन कापडणे, प्रशांत पाटील यांनी मालपूर येथून ताब्यात घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!