लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी एप्रिलपर्यंत प्रतीक्षा-मुख्यमंत्री फडणवीस.

24 प्राईम न्यूज 6 Dec 2024. महायुतीला विधानसभा निवडणुकीत अद्वितीय आणि अभूतपूर्व यश मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या राज्यातील लाडक्या बहिणींना वाढीव २ हजार १०० रुपयांच्या मदतीसाठी एप्रिल २०२५ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असून निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे बहिणींना २१०० रुपये दिले जातील, मात्र त्याचा विचार आम्ही आगामी अर्थसंकल्पात करू, असे सांगितले. त्याचवेळी केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेप्रमाणे लाडकी बहीण योजनेत निकषाबाहेरचे लाभार्थी असतील आणि त्याविषयी तक्रारी आल्या तर अशा लाडक्या बहिणींचा पुनर्विचार होईल, मात्र सरसकट पुनर्विचार होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.