आमदार कार्यालया बाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा..

आबिद शेख/अमळनेर.राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी मुंबई येथे शपथ घेतली. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार विराजमान झाल्याने अमळनेर येथे महायुतीच्या पदाधिकारी वराज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी मुंबई येथे शपथ घेतली. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार विराजमान झाल्याने अमळनेर येथे महायुतीच्या पदाधिकारी वकार्यकर्ते यांच्याकडून आमदार कार्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या कार्यालयाबाहेर महायुती च्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील,भाजपचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, माजी जि.प. सदस्य अॅड. व्ही. आर. पाटील, माजी पंचायत समिती सभापती शाम अहिरे, -महेश पाटील, देविदास देसले, वाल्मीक पाटील, भूषण पाटील तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.