लाडक्या बहिणीं’च्या कागदपत्रांची होणार पडताळणी..

24 प्राईम न्यूज 5 Dec 2024. -विधानसभा निवडणुकीत कळीच्या ठरलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेच्या अर्जाची पुन्हा उलटतपासणी करण्यात येणार व असल्याचे समजते. खोट्या दाव्यांच्या पडताळणीसाठी त अर्जदारांनी दाखल केलेल्या मकागदपत्रांची पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे. या तपासणीअंती पात्र लाभार्थी महिलांच्या कागदपत्रांमध्ये काहीत्रुटी आढळल्या तर, त्यांना या योजनेपासून मिळणाऱ्या लाभास मुकावे लागेल.
या प्रक्रियेत राज्य आणि स्थानिक सरकारी अधिकारी, समाजकल्याण संघांसह अनेक विभागांचा समावेश असणारआहे. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेची रक्कम १५०० वरून २१०० रुपये केली जाईल, असे आश्वासन महायुतीने दिले होते. आता हे आश्वासन पूर्ण करणार असल्याचे महायुतीच्या नेत्यांनी सांगितले. आतापर्यंत २ कोटींहून अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर, राज्यभरातील ‘लाडकी बहीण’ योजनेच्या पात्र आणि लाभार्थी महिलांची तपासणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ही योजनेचे लाभ केवळ पात्र महिलांनाच मिळावेत, यावर सरकारचा भर आहे. आर्थिक सहाय्य वितरणात – पारदर्शकता येण्यासाठी ही प्रक्रिया केली जाणार आहे. या प्रक्रियेद्वारे, खोटे दावे करणाऱ्या किंवा फसवणूक करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी अधिकृत रेकॉर्डसह सादर केलेल्या कागदपत्रांची उलटतपासणी होणार आहे. ज्या लाभार्थ्यांना आधीपासून लाभ मिळाला आहे, त्यांना तपासणीच्या अनेक टप्प्यांना सामोरे जावे लागणार आहे. – पहिल्या टप्प्यात ओळखीचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा आणि अर्जदारांनी दाखल केलेल्या इतर संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. अधिकारी पडताळणीसाठी थेट लाभार्थ्यांच्या घरी भेट देतील. यामध्ये पात्रतेची पुष्टी करण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण होऊ शकते. -हे लाभार्थी ठरणार अपात्र
निवृत्तीवेतन प्राप्त करणारे किंवा चारचाकी वाहनधारक अर्जदार. -ज्या महिलांच्या नावावर पाच एकरांपेक्षा जास्त जमीन. -एका कुटुंबातील फक्त दोन महिलांनाच या योजनेच लाभ.