उद्या मंत्रिमंडळ विस्तार-अजितदादा खातेवाटप गोंधळ कायम.

24 प्राईम न्यूज 13 Dec 2024.
-महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमधील नेते मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसले आहेत, परंतु मंत्रिमंडळ विस्ताराची अधिकृत तारीख जाहीर होत नसल्याने कुणाला कुठले खाते मिळणार याची उत्कंठा कमालीची वाढली आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख अजून ठरायची आहे, असे सांगत असताना मंत्रिमंडळाचा विस्तार शनिवारी १४ डिसेंबरला होईल, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केला आहे. येत्या सोमवारपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होणार असून गृहमंत्री आणि अर्थमंत्री या दोन पदांवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अडून बसल्याचे समजते.
