अमळनेर तालुक्यात शिक्षकभवन उभारावे,जुनी पेन्शन योजना लागू करावी हिवाळी अधिवेशनात प्रश्न लावून धरावा. -विविध पदाधिकाऱ्यांची आमदार सत्यजित तांबे यांच्याकडे मागणी.

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : तालुक्यात शिक्षक भवन उभारावे तसेच २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात प्रश्न प्राधान्याने लावून धरावा अशी मागणी अमळनेर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे विधानपरिषद सदस्य सत्यजित तांबे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
अमळनेर तालुक्यात खाजगी प्राथमिक ,माध्यमिक तसेच ज्युनियर कॉलेज ,सिनियर कॉलेज , जिल्हापरिषद शाळांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्याचप्रमाणे याठिकाणी प्रतिपंढरपूर वाडी संस्थान , मंगळ मंदिर ,भविष्यातील सानेगुरुजी स्मारक , प्रताप तत्वज्ञान केंद्र अशी बहुअंगी पर्यटन स्थळे असल्याने तालुक्यात शिक्षक भवन असावे. त्याचप्रमाणे तालुक्यातील उर्वरित शाळांमध्ये डिजिटल स्क्रीन ,संगणक ,प्रिंटर पुरवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर ग्रामविकास शिक्षण मंडळाचे सचिव श्रीकांत पाटील , माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील , जुनी पेन्शन संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रभूदास पाटील ,मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष तुषार बोरसे ,टी डी एफ चे तालुकाध्यक्ष सुशील भदाणे , एस एन पाटील ,खाजगी प्राथमिक संघटनेचे अमोल पाटील ,मयूर पाटील , महेंद्र पाटील , प्रशांत कापडणे, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राहुल पाटील , सुदर्शन पवार ,खुशाल पाटील ,योगेश जाधव हजर होते.
