अॅड. मनोहर भांडारकर निवर्तले..

आबिद शेख/अमळनेर. अमळनेर येथील खा.शि.मंडळ या संस्थेचे माजी अध्यक्ष अॅड. मनोहर भिकाजीशेठ भांडारकर (९०) हे सोमवारी वृद्धापकाळाने निवर्तले. शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक स्तरावर त्यांचे योगदान होते.
येथील सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे अध्यक्ष, विहिंप चे अध्यक्ष, अमळनेर वकील संघाचे चिटणीस, म.वा. मंडळाचे कोषाध्यक्ष, श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजाचे अध्यक्ष, शनि मंदीर न्यासचे विश्वस्त, प्रजापिता ब्रम्हाकुमारी केंद्राचे सदस्य, श्री. रामचंद्रभाऊ हिंदू स्मशान भूमीन्यासचे अध्यक्ष, रोटरी क्लब मध्येदेखील त्यांचा सक्रीय सहभाग होता.
ग्राहक पंचायत चे अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, येथील अशा अशा कितीतरी पदांच्या जबाबदाऱ्या त्यांनी चोखपणे संभाळल्या आहेत.
प्रताप कॉलेजच्या मराठीच्या वरिष्ठ निवृत्त प्राध्यापिका डॉ. माधुरीताई भांडारकर यांचे ते पती होत.मनोहर भांडारकर हे मनमिळाऊ स्वभावाचे होते.
अॅड. आण्णासो. मनोहर भांडारकर यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले, सूना, नातू, पंतू असा परिवार आहे.
पाडळसे धरण संघर्ष समितीचे सदस्य हेमंत भांडारकर यांचे ते वडील होत.